Love Poem In Marathi

100+ मराठी कविता प्रेमाच्या | Love Poem In Marathi | Premachya Kavita in Marathi.

Love Poem In Marathi /(प्रेम कविता चारोळ्या)

मराठी कविता प्रेमाच्या
मराठी कविता प्रेमाच्या


नमस्कार मित्रांनो आमच्या वेबसाईटवर स्वागत आहे. जर तुम्ही मराठी कविता प्रेमाच्या, लव्ह स्टेटस मराठी, मराठी लव्ह शायरी एसएमएस किंवा मराठी मजकुरातील लव्ह मेसेज शोधत असाल तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. गर्लफ्रेंडसाठी मराठीतील लव्ह कोट्स, बॉयफ्रेंडसाठी मराठीतील लव्ह कोट्स तुम्हाला आवडत असल्यास प्रेम एसएमएस मराठी, सोशल मीडियावर मराठी फोटो शेअर आणि, मराठी प्रेम कोट्स पोस्टसाठी आमचा ब्लॉग www.anshpandit.com आहे. इच्छा भेट.

मराठी कविता प्रेमाच्या आठवणी(एकतर्फी प्रेम कविता)


एकदा ती माझ्याकडे आली
माझ्या बरोबर चल म्हणाली,
हो म्हणायच्या आतंच ती
देऊन हात, घेऊन गेली
होतो सोबत आम्ही चालत
कधी शांत कधी बोलत,
पायवाट निळसर नव्हती
संपत नभी चांदणे,
चंद्रा संगत गोड
गप्पा नव्हत्या थांबत…✔

अपराधी कुणी का असेना..
पण वेदना खुप होतात
विरहात तुझ्या..
चुका होतात पण विरह
नको मला ..
बोलून भांडण झाले 
तरी चालेल पण,
अबोला सहन होतं
नाहीये मनाला…✔

तुझ्या अशा फसव्या नजरांनाच
मी भुलत गेलो
तू सोडत होतीस केस मोकळे
मी मात्र गुंतत गेलो

तुझ्या जादुई हसण्यातच
मी फसत गेलो
त्या मोहवणाऱ्या क्षणात
मी हरवत गेलो

तुझ्या पुसटश्या स्पर्शानही
मी बेभान होत गेलो
तो गंध माझ्या तन-मनात
नकळत साठवत गेलो

कळलं नाही हा श्वास
कधी झाला तुझा
इतकी प्रीत तुझ्यावर
मी कसा करत गेलो…✔


खळीत गुंतलेला तो
डोळ्यात रिझलेली ती
तिच्या स्पंदनातला तो
त्याच्या श्वासातली ती
तिच्या डोळ्यांच्या फडफडीतला तो
त्याचा उचकीतली ती
कमरेवर हात बांधून उभा राहिलेला तो
कौतुकाने त्याच्याकडे बघत
त्याचेच अनुकरण करणारी ती…✔


वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या ………..

बघता तुझी सावली जचली या मनाला
हरवून भान सारे मी शोधतो कुणाला
वाटेवरी उभा त्या मी रोजचाच होतो
घेतांना थांग तुझा विचारतो कुणाला
वेड्या मनास माझ्या …………

वाटे हवा हवा का हा जीवनी किनारा
बघ वाहूनिया आला बेधुंद गार वारा
प्रेमाची साथ अपुली जोडू ये सांजवेळी
पाहू नकोस मागे समजून घे इशारा
वेड्या मनास माझ्या…✔

येतील चांद तारे देतील साक्ष तुजला
प्रेमात खोट नाही विचार या नभाला
आलीस तू जीवनी होऊन आशा नवी
दे अर्थ तू साजणी बेअर्थी जगण्याला…✔

वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही
ये ना प्रिये समोरी जगण्यास मान नाही
वेड्या मनास माझ्या कसलेच भान नाही


माझा प्राण नाही पण आत्मा तु आहेस.,
माझा श्वास तुच आहेस…
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…

जग किती सुंदर आहे बघ माझ्या मिठीत येऊन..
डोळे लावुन भिजुन जा..
माझ्या प्रेमाच्या धुंद वर्षावात…

कितीही झालं तरी प्रिये तु माझी जान आहेस
आता माझ्या जगण्याची आस तुच आहेस…✔


कुणाच्याही आयुष्यात आपली एक जागा असावी हक्काची किवा महत्त्वाची नसली तरी चालेल पण ती कधीही बदलणारी नसावी 


तिची तक्रार आहे कि मी प्रत्येक मुलीकडे बघून हसतो कस सांगू तिला कि प्रत्येक मुलीमध्ये मला तिचाच चेहरा दिसतो  


आयुष्यभर हसवेन तुला पण मला कधी रडवून जाऊ नकोस काळजी घेईन तुझी पण मला कधी सोडून जाऊ नकोस  

जीवन जगता जगता एकदाच प्रेम 💞 करायचे असत
तेच प्रेम आयुष्यभर मनात जपायचं असतं


किती छान वाटतं ना, जेव्हा कोणी तरी म्हणतं,
स्वतःची काळजी घे Please माझ्यासाठी🌹

आयुष्यात ती व्यक्ती सापडायला भाग्य लागतं.
जी तुम्हाला हसायचं नसतं, तेव्हा पण ती..
हसवण्याचा प्रयत्न करते

प्रेमात पडणे खूप सोपं असतं,
पण जन्मभर प्रेम करून कोणत्याही
परिस्थितीत साथ देणं म्हणजे खरं प्रेम💞


माझं प्रेम तुझ्यावर आहे आणि शेवटपर्यंत तुझ्यावरच राहणार 

कुणासाठी जळतांना स्वत: व्हायचे अंधार आंधळ्याला वाट घ्यावी असा दिव्यांचा संसार

मन गुंतायला वेळ लागत नाही मन तुटायला ही वेळ लागत नाही वेळ लागतो तो गुंतलेल्या मनाला आवरायला आणि तुटलेल्या मनाला सावरायला  

आकाशाला टेकतील एवढे लांब हात नाहीत माझे.चंद्र तारे साठवुन ठेवतील एवढे खोल डोळे नाहीत माझे पण तु दिलेले प्रेम नेहमी जपुनठेवील एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे  

आजकाल कोणाशी जास्त पटत नाही बोललेल कोणाला आवडत नाही जवळ असलेलेच मग दूर होताना क्षणाचाही विचार करत नाही

तू माझ्यावर प्रेम कर किंवा नको करु,
तुझी मर्जी..
पण मी तुझ्यावरच प्रेम करणार,
ही माझी मर्जी..


मी तुझ्यासाठी,
कितीही वर्ष थांबायला तयार आहे,
पण मला पाहिजे तर फक्त तूच..

प्रेमाच्या हाकेला साद मिळाली स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली मन माझं खुदकन हसलं तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं  


हे पण वाचा:-

मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला True Love Quotes in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Love Quotes in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *