Quotes

Positive Suvichar in Marathi | 200+ पॉझिटिव्ह सुविचार मराठी

Positive Thinking Life Success Suvichar in Marathi

नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने आलेले
हात वापरा.

Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


आज आपण क्रिएटर मराठी वेबसाइटवर Positive Suvichar in Marathi संग्रह पाहणार आहोत. 200+ Positive Suvichar Marathi वाचून तुम्ही आयुष्यात नव्या उमेदीने काम करू शकता. त्यामुळे तुम्ही,चांगले विचार स्टेटस मराठी, मराठी सुविचार कोट्स, मराठी पॉझिटिव्ह स्टेटस आणि मराठी Positive Suvichar संग्रह जरूर वाचा.


आजचे जग खूप वेगाने पुढे जात आहे. पूर्वी एकमेकांशी बोलण्यासाठी फोनचा वापर केला जायचा. पण आता जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकांशी बोलण्यासाठी सोशल मीडियाचा वापर केला जातो. सध्याचे युग आणि येणारे युग हे सोशल मीडियाचे युग मानले जाणार आहे. सोशल मीडिया जीवन-मरण बनल आहे.


जर आपल्याला एखादी गोष्ट लोकांपर्यंत त्वरीत पोहोचवायची असेल तर ती आपण व्हॉट्सअँप, ट्विटर आणि फेसबुकसारख्या सोशल मीडिया अँपद्वारे पटकन पोहोचवू शकतो. दररोज सकाळी उठून एक चांगला विचार ठेवण्याची सवय सर्वत्र झाली आहे, एक प्रेरणादायी कोट्स पहिली गोष्ट आहे.


म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत पॉझिटिव्ह सुविचार मराठी स्टेटसचा मराठी जीवन विचार आणि स्थिती संग्रह. जर तुम्ही Instagram, Facebook आणि Whatsapp साठी पॉझिटिव्ह मराठी सुविचार आणि कोट्स शोधत असाल तर आमचे मराठी संग्रह नक्की वाचा.सौंदर्य हे स्त्रीचे सामर्थ्य आहे
तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य आहे.
Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


जेवढं मोठं स्वप्नं तेवढ्याच मोठ्या अडचणी
आणि जेवढ्या मोठ्या अडचणी यशही तेवढंच मोठं.जिंकण्याचा विचार मी नाही कधी करत,
मी फक्त, हरायचे नाही हा इरादा पक्का करतो.कोणताही बिजनेस छोटा नसतो,
छोटी असते आपली मानसिकता.श्रीमंत आणि यशस्वी होण्यासाठी
आयुष्यातला क्षण न क्षण कोणत्यातरी एका
क्षेत्रात सातत्याने मेहनत करावी लागते.अपयश हे संध्याकाळी विसरून जायचे असते,
कारण उद्याची येणारी सकाळ हि तुम्हाला एक
नवीन संधी असते यशापर्यंत पोहचण्याची.पैश्याचा पाठलाग करू नका,
तुमच्या स्वप्नांचा पाठलाग करा.यशस्वी होण्यासाठी आपण यशस्वी होऊ शकतो
यावर सर्वप्रथम विश्वास ठेवला पाहिजे.


भविष्यात घडणाऱ्या घटनांचा विचार करीत बसण्यापेक्षा 
वर्तमानकाळातील घटनांचे निर्णय विचारपूर्वक घ्या.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


पाप होईल इतके कमवू नये,
आजारी पडू इतके खाऊ नये,
कर्ज होईल इतके खर्चू नये,
आणि भांडण होईल असे बोलू नये.अशक्य काम शक्य करण्यात एक
वेगळीच मजा आहे.आयुष्यात स्वतःच्या आत असलेल्या कलेचा
कधीही घमेंड करू नका,
कारण दगड जेव्हा पाण्यात पडतो तेव्हा
स्वतःच्याच वजनामुळे बुडाला जातो.कोणतेही यश अपयश हे आपण
घेतलेल्या निर्णयावर अवलंबून असते.तुम्ही ज्याची इच्छा ठेवता ते तुम्हाला मिळत नाही,
तुम्हाला ते मिळतं ज्याच्यासाठी तुम्ही काम करता.


शील ही जन्मभर पुरणारी आणि मृत्युनंतर पण 
पुरून उरणारी संपत्ती आहे.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


पैसे हा खतासारखा आहे
तो साचवला की कुजत जातो
आणि गुंतवला तर वाढायला मदत करतो.marathi business quotes
व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.तुमच्या चाली रचण्याआधीच
त्या जाहीर करू नका.व्यवसायात तुम्ही कधीच पराभूत होत नाही,
तुम्ही एकतर जिंकता किंवा शिकता.पैसे मला प्रेरित करत नाही,
तर पैसा मिळाल्यावर मिळणारे स्वातंत्र्य
मला प्रेरित करत असते.


भूकेने व तहानेने कासावीस झालेल्या माणसास बोधामृत पाजण्यापेक्षा अन्नाचे चार घास व पाण्याचा घोट देणे अधिक योग्य.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


जी माणसं निश्चयी असतात
त्यांना काहीच अशक्य नसतं.मागितलेली गोष्ट परत द्यावी लागते,
कमावलेली नाही,
आणि तुम्ही इथे कमवण्यासाठी आला आहात,
मागण्यासाठी नाही.ज्या पायरीची मदत घेऊन आपण पुढची
पायरी गाठली आहे त्या पायरीला कधीही विसरू नये,
कारण त्या पायरीचा आधार घेतला नसता तर
आपण पुढची पायरी कधीच ओलांडू शकलो नसतो.ज्यांनी ज्यांनी मला नकार दिला,
त्यांचा मी खूप आभारी आहे;
त्यांच्यामुळेच मी आज या गोष्टी
स्वतः करू शकलो.प्रभाव दमदार असण्यापेक्षा
स्वभाव दिलदार असावा.यश केव्हा मिळेल यापेक्षा
तयारी केव्हा सुरु करायची आहे हे
ठरवणाराच यशस्वी होतो.आयुष्य हे कवड्यांच्या खेळाप्रमाणे असते
तुमचा आवडता अंक नाही आला,
तर पुन्हा खेळावेच लागते.


खऱ्या विद्यार्थ्याला कधीच सुट्टी नसते. 
सुट्टी ही त्याच्यासाठी नवं काहीतरी शिकण्याची संधी असते.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


नेहमी चांगल्या लोकांच्या संगतीत रहा
कारण सोनाराचा कचरा सुद्धा
वाण्याच्या बदामापेक्षा महाग असतो.सगळे कागद सारखेच असतात,
फक्त त्याला अहंकार चिकटला की त्याचं
सर्टिफिकेट होऊन जातं.ध्येयावर न पोहोचणे ही शोकांतिका नाही,
पोहचण्यासाठी ध्येयच नसणे ही
खरी शोकांतिका आहे.स्वप्न मोफतच असतात,
फक्त त्यांचा पाठलाग करताना
आयुष्यात बरीच किंमत मोजावी लागते.स्वतःच्या स्वप्नांचा बंगला बांधायला घ्या,
नाहीतर कोणीतरी तुम्हाला त्यांच्या स्वप्नांची
इमारत बांधायला कामाला ठेवेल.कधी हार मानवीशी वाटलीच तर एकदा
तुम्ही सुरवात का केली होती हे आठवून बघा.नारळ आणि माणूस दर्शनी किती चांगला
असला तरी नारळ फोडल्याशिवाय
आणि माणूस जोडल्याशिवाय कळत नाही.


हिंसा हे जगातलं सगळ्यात मोठं पाप आहे
मग ती एखाद्या माणसाची असो वा पशुची !


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in मराठी


हरण्याची पर्वा कधी केली नाही
जिंकण्याचा मोह ही केला नाही
नशिबात असेल ते मिळेलच
पण प्रयन्त करणे मी सोडणार नाही.
दिवा बोलत नाही
त्याचा प्रकाशच त्याचा परिचय देतो
त्याचप्रमाणे तुम्ही स्वतःविषयी काहीच बोलू नका,
उत्तम कर्म करत रहा, तेच तुमचा परिचय देतील.Instagram Marathi Status
सोन्याची पारख सोन कापून,
घासून आणि तापवून होते.
माणसाची पारख गुणाने,
त्यागाने आणि चारित्र्याने होते.जेव्हा काही माणसांना
तुमच्यातलं चांगलं सहन होत नाही
तेव्हा ते इतरांना तुमच्यातलं
वाईट सांगायला सुरवात करतात.जेव्हा तुम्हाला कुमकुवत पणा जाणवेल
तेव्हा सामर्थ्यवान व्हा.
जेव्हा घाबराल तेव्हा हिमंतवान व्हा,
आणि विजयी असतांना नम्र व्हा.


मनाचे दरवाजे नेहमी खुले ठेवा
ज्ञानाचा प्रकाश कुठुन कधी येईल सांगता येत नाही.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


आज जे तुमच्या ध्येयांवर संशय घेत आहेत
तेच उद्या तुम्हाला विचारणार आहेत
तुम्ही हे कसं केलंत.कल्पनांना सत्यात उतरविण्याची
ज्यांच्यात धमक असते,
त्यांना कोणीच रोखू शकत नाही.मी पाहिलंय, मला ते हवंय,
मी त्यासाठी मेहनत करणार
आणि ते मी मिळवणारच.लोक काय म्हणतील याचा विचार करत जगलात,
तर आयुष्यभर त्यांचे गुलाम म्हणून जगाल.स्वतःच्या कामावर विश्वास असणारी माणसं
अपयशाचं खापर दुसऱ्यावर फोडत नाहीत.खरा योद्धा तो नाही जो नेहमीच जिंकतो,
खरा योद्धा तो आहे जो नेहमीच लढायला
तयार असतो.


स्वत:च्या स्वार्थासाठी दुसऱ्याचा वापर कधी करु नका आणि स्वत:चा वापर कुणाला करु देऊ नका.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


विश्वास इतरांवर इतका करा की,
तुम्हाला फसवताना ते स्वतःला दोषी समजतील.स्वतः ठाम रहा,
कोणाचेही अनुकरण करू नका.ज्या लोकांनी तुम्हाला निराश केले
त्यासाठी त्यांना दोष देऊ नका,
स्वतःला दोष द्या कारण
तुम्ही त्यांच्याकडून जास्त पॆक्षा ठेवल्या.हरण्याची काळजी अन जिंकण्याची
महत्वकांक्षा न बाळगता प्राण पणाला लावून
लढावं म्हणजे विजय तितकाच आनंददायी होतो
आणि पराभव झालाच तर तो तितकासा बोचत नाही.जर तुम्हाला आयुष्यात खूप संघर्ष करावा लागत असेल,
तर स्वतःला खूप नशीबवान समजा,
कारण देव संघर्ष करायची संधी फक्त त्यांनाच देतो
ज्यांच्यामध्ये क्षमता असते.नियती जेव्हा तुमच्या हातून काही हिरावून घेते
तेव्हा त्याहीपेक्षा काही मौल्यवान देण्याकरिता
तुमचा हात रिकामा करीत असते.


उषा आणि निशा जशा दिवसाच्या साथीदार आहेत तसे सुख दुःख माणसाचे सोबती आहेत.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


काहीवेळा आपल्याला सर्वोत्कृष्ट मिळवण्यासाठी
सर्वात वाईट गोष्टींतून जावे लागते.अडचणी आयुष्यात नव्हे तर मनात असतात.
ज्या दिवशी मनावर विजय मिळवाल
त्या दिवशी आपोआप मार्ग निघेल.जर तुम्ही तुम्हाला गरज नसलेल्या
गोष्टी विकत घेत असाल,
तर लवकरच तुम्हाला तुमच्या गरजेच्या गोष्टी
विकण्याची वेळ येणार आहे असं समजा.पाहिलेल्या पावसाळ्यापेक्षा अनुभवलेले
पावसाळे जास्त महत्वाचे असतात.


अवघड क्षणीही न डगमगता जो अचूक निर्णय घेतो तोच जीवनाच्या लढाईत जिंकतो.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


रात्रीचा अंधार कितीही मोठा असू द्या,
सकाळचा सूर्य प्रकाश घेऊनच येतो.जग गरजेच्या नियमानुसार चालत असतं
थंडीत ज्या सूर्याची वाट बघितली जाते,
उन्हाळ्यात त्याच सूर्याचा तिरस्कार केला जातो,
तुमची किंमत तेव्हा होईल
जेव्हा तुमची गरज लक्षात येईल.शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द
ज्याचा अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय.खेळ पत्त्यांचा असो किंवा आयुष्याचा
तुमचा एक्का तेव्हाच दाखवा जेव्हा
समोर बादशाह असेल.आयुष्यात कितीही अपयश पदरात पडलं तरी चिंता नाही,
कारण जिंकण्याची जिद्द जोपर्यंत जिवंत आहे,
तोपर्यंत कोणीही तुम्हाला रोखू शकत नाही.आयुष्य म्हणजे तुम्ही किती श्वास घेतलेत हे नसून
तुमच्या आयुष्यात श्वास रोखणारे किती क्षण आले हे आहे.


तोंडातून गेलेला शब्द व धनुष्यातून सुटलेला बाण हा कधीही परत येत नाही.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


फक्त जिंकणारच नाही तर,
कधी, कुठे काय हरायचं
हे जाणणारा सुद्धा सिकंदर असतो.तुमच्याने पुढे जाता येत नसेल तर जाऊ नका,
पण पुढे जाणाऱ्याला मागे खेचू नका.कोणालाही आपल्या कुमकुवत बाजू सांगू नका,
आजचा तुमचा दोस्त उद्या तुमचा वैरी होऊ शकतो.यशस्वी माणसं पैश्यासाठी काम करत नाहीत,
पैश्याला त्यांच्यासाठी काम करायला लावतात.स्वतःच्या मेहनतीवर विश्वास असणाऱ्यांना
आपला प्रतिस्पर्धी काय करतोय याची
अजिबात पर्वा नसते.


स्वप्न ही रंगविण्यासाठी असतात कारण स्वप्न सत्यात साकारणे फार कठीण असते.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathiकधी कोणाला समजवायचा
प्रयन्त करत बसू नका,
कारण माणसं तेवढंच समजतात
जेवढी त्यांची कुवत असते.या जगात बोलणारे आणि
विचार करणारे खूप आहेत,
तुम्ही कृती करणारे व्हा.चांगल्या वेळेची वाट पाहणे सोडून द्या,
कारण वेळ कधीच तुमची वाट पाहणार नाही.डोक्यामध्ये सकारात्मक विचार भरले नाही तर
नकारात्मक विचार आपली जागा बनवतात.जीवनात काही केलं नाही तरी चालेल
पण स्वतःवरचा विश्वास
मात्र कधीही कमी होऊ देऊ नका.


प्रेम सर्वांवर करा
विश्वास थोड्यांवर ठेवा 
पण व्देष मात्र कोणाचाच करू नका.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


जेव्हा तुम्ही स्वतःला गरीब म्हणता
तेव्हा तुम्ही आयुष्याची लढाई हारली असे समजा.जर तुम्ही माझ्या संघर्षाच्या वेळी गैरहजर असाल,
तर अपेक्षा पण ठेवू नका माझ्या यशाच्या वेळी
हजर राहण्याची.माणसाची नीती चांगली असेल तर
मनात भीती उरत नाही.हातचे सोडून पळत्याच्या मागे
कधीही लागू नये.


सर्वच प्रश्न सोडवून सूटत नाहीत
काही सोडून दिले की आपोआप सुटतात.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


चांगल्या रस्त्याला गतिरोधक
आणि चांगल्या व्यक्तीला विरोधक हे
असतातच.छाटले जरी पंख माझे पुन्हा उडेन मी,
कारण अडवू शकेल मला अजून अशी भिंत नाही.पैसे कमवायला एवढा वेळ वाया घालवू नका की
नंतर पैसे खर्च करायला वेळच मिळणार नाही.जर तुम्ही तणाव हाताळू शकला नाही,
तर यशही हाताळू शकणार नाही.चांगल्या दिवसांची किंमत
वाईट दिवसांना सामोरे गेल्याशिवाय
कळत नाही.एकदा का आपल्या खांद्यांना
आव्हान पेलायची सवय झाली,
की आपली पावलं सुद्धा
आपोआप संघर्ष करू लागतात.अंथरून पाहून पाय पसरले कि
कुणापुढे हात पसरावे लागत नाहीत.


आनंदी मन
सुदृढ शरीर आणि अध्यात्मिक श्रध्दा 
ह्या तिनही गोष्टी लाभणं म्हणजे अमृत मिळणं.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


वय आणि पैसा यावर कधीच गर्व करू नये,
कारण ज्या गोष्टी मोजल्या जातात
त्या नक्कीच संपतात.जगात काहीच फुकट भेटत नाही
सल्ल्याशिवाय.काय चुकलं हे शोधायला हवं
पण, आपण मात्र
कोणाचं चुकलं हेच शोधत राहतो.आळशी माणूस
कामाच्या विचारानेही थकतो.हे ईश्वरा सर्वांचं भलं कर
पण सुरवात माझ्यापासून कर.हृदयात खूप जागा होती
पण काय करणार काही लोकांना
डोक्यात बसायला जास्त आवडतं.नशीब हातात येत नाही
तो पर्यंत नशिबाने आलेले
हात वापरा.


खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. 
आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


बारशाला घरातले आणि
इतर वेळेस बाहेरचे नाव ठेवतात.समजूतदार लोक कधी भांडत नाहीत
फक्त आग लावून बाजूला होतात.मी संकटाना कधीच शोधत नाही
पण त्यांनाच मी सापडतो.आजकाल बाईकवर मुलांच्या मागे
मुली अश्या बसतात जणू
विक्रमादित्याला वेताळ लटकला आहे.प्रत्येकाने आपल्या चुकांना
दिलेलं नाव म्हणजे अनुभव.मन मोकळे असणे कधीही चांगले,
परंतु जीभ कधी मोकळी सोडू नका.हातपाय न हळवता मिळालेल्या
पैश्याला लगेच पाय फुटतात.माणूस म्हणतो,
पैसा आला की मी काही तरी करेन
पैसा म्हणतो,
तू काहीतरी कर मगच मी येईन.


ज्ञानी माणसाबरोबर एकदाच केलेले संभाषण हे 
पुस्तकाचा अभ्यास करण्यापेक्षा जास्त सरस आहे.


Positive Suvichar in Marathi
Positive Suvichar in Marathi


माफी चुकी करणाऱ्याला दिली जाते
विश्वासघात करणाऱ्याला नाही.one sided love marathi status
त्या व्यक्तीला कधीच इग्नोर करू नका
ज्याने तुमच्यासाठी पूर्ण दुनियेला इग्नोर केलं.नाचणारा मोर आणि पैश्यांचा जोर
कायमस्वरूपी नसतो,
काळ संपला की पिसारा आणि पसारा
आटपावा लागतो.सोडून देऊ नका
कधी कधी चाव्यांच्या जुडग्यात
शेवटची चावी त्या कुलुपाची असते.नको असलेल्या अपेक्षा वाढल्या की
हवी असणारी माणसं गमावण्याची वेळ येते.काही नाही या शब्दामागे
खूप काही लपलेलं असतं.आपल्याला चटके देणारे काही दिवे तेच असतात,
ज्यांना आपण वाऱ्यामुळे विझताना वाचवलेलं असतं.मनातलं जाणणारी आई
आणि भविष्य ओळखणारा बाप
म्हणजे जगातील एकमेव ज्योतिष.मला इगो सोडायचाय
पण त्यातही इगो आड येतो.


हे पण वाचा:-

मला आशा आहे की आजच्या लेखात नमूद केलेला Positive Suvichar in Marathi तुम्हाला आवडला असेल. मला आशा आहे की तुम्ही यातून प्रेरित व्हाल आणि तुमचे जीवन चांगले जगाल.

या लेखातील या Good Thoughts in Marathi संदर्भात तुम्हाला काही शंका असल्यास किंवा तुम्हाला त्यात सुधारणा करावी असे वाटत असल्यास, तुम्ही आम्हाला टिप्पण्यांमध्ये किंवा ईमेलमध्ये कळवू शकता.

यातून तुम्हाला काही नवीन शिकायला मिळाले असेल तर कृपया ही माहिती जास्तीत जास्त इतरांना शेअर करा. ते फेसबुकट्विटर, इंस्टाग्राम आणि इतर सोशल मीडिया साइटवर शेअर करा. धन्यवाद. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *